Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्राम्हणशेवगे येथील सुरू उपोषण लिखीत आश्वासनानंतर मागे

चाळीसगाव प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत ओला दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चांकडून तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्ग टेकडीवर उपोषण सुरू होता. दरम्यान प्रशासनाकडून लिखीत आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ढगफुटीसह संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चांकडून २ ऑक्टोबर रोजीपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. महात्मा गांधी यांची जयंतीच्या औचित्य साधून  लोकसंघर्ष मोर्चांनी ह्या उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान ओला दुष्काळासह, शेत शिवारातील रस्ते तयार करा, अवैध्य वृक्षतोड थांबवा अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण सुरू होते. दरम्यान प्रशासनाकडून लिखीत स्वरुपाची आश्वासन मिळाल्याने तात्पुरती ह्या उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी २ ऑक्टोबर पासून ह्या उपोषणाला सुरुवात केली होती.

सलग पाच दिवस हे उपोषण सुरू ठेवल्यानंतर गुरूवार,७ ऑक्टोबर रोजी तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडील लिखीत स्वरुपाचा आश्वासन आल्याने आंब्याच्या रोपाची लागवड करून उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पवार, रविंद्र देसले, रत्नाकर पाटील, पोलीस पाटील राजेंद्र माळी, प्रशांत निकम, ह. भ. प. विठ्ठल देसले, दिगंबर मोरे, प्रवीण देसले, विष्णू राठोड, ज्ञानेश्वर देसले, तात्याभाऊ पाटील व मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

 

Exit mobile version