Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृध्दाचे बंद घर फोडून चांदीचे भांडे लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भोईटे नगरात ६५ वर्षीय वृध्दाचे बंद घर फोडून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे चांदीचे भांडे चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील भोईटे नगरात प्रदीप एकनाथ अरकडी वय ६५ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० फेब्रुवारी ते १ एप्रिल दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे चांदीचे भांडे चोरून नेल्याचे उघडकीला आले. हा प्रकार घडल्यानंतर प्रदीप अरकडी यांनी शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन बडगुजर हे करीत आहे.

Exit mobile version