Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव वाहनाने वृध्दाला चिरडले !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील ७० वर्षीय वृध्दाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवाशी विश्वनाथ लक्ष्मण राणे (वय-७०) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ३ मे रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी पायी येत होते. वाचमनचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद गावाच्या पुढे जात असल्याने त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version