Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलच्या दरोड्यातील गुन्हेगारांची नावे निष्पन्न; एकाला कांदीवलीतून अटक

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या कवडिवाले यांच्या सराफा दुकानावर ७ जुलै रोजी दुपारी चार दरोडेखोरांना बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लुटले होते. या दरोड्यांतील पाच गुन्हेगारांचे नावे निष्पन्न झाले असून एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरूवार १४ जुलै रोजी कांदीवील मुंबई येथून अटक केली आहे.

निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय-३२) रा. रामनगर ता. कन्नड जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक आणी शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे दिनांक ७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. पालकमंत्र्यांनी या दरोड्याची उकल पोलीस प्रशासन लवकरच करेल अशी ग्वाही दिली होती. संशयित आरोपी हा कांदीवली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी संशयित आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय-३२) रा. रामनगर ता. कन्नड जि.औरंगाबाद याला आज गुरूवारी १४ जुलै रोजी सकाळी कांदीवली मुंबई येथून अटक केली. त्याची चौकशी केली असताना दरोड्यातील गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव रा. बोरवाला ता. यावल ह.मु. तापीकाठ स्मशानुभमी जवळ भुसावळ, सुनिल अमरसिंग बारेला रा. गोऱ्या पाडा ता. चोपडा, रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी रा. श्रीराम नगर भुसावळ आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी रा. मोहित नगर भुसावळ यांचा समावेश असल्याचे सांगितले.

 

 

Exit mobile version