Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपा १४ वर्षा आतील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये पोदार तर मुलांमध्ये सेंट लॉरेन्स विजयी

WhatsApp Image 2019 08 20 at 6.57.57 PM

जळगाव,प्रतिनिधी | १४ वर्षा आतील मनपा स्तरीय फुटबाल स्पर्धेचे औपचारिक उदघाटन फारूक शेख, वंदना तिवस्कर व छाया पाटील यांनी नाणेफेक, किक मारून व खेळाडूंना शुभेच्छा देऊन केले.

परितोषिक वितरण समारंभ स्पर्धेचा पारितोषिक वितरणासाठी मनपा नगरसेविका ज्योती चव्हाण, नगरसेवक रियाझ बागवान, मनपा विधी अधिकारी अॅड.आनंद मुझुमदार, बेंडाळे महाविद्यालयाच्या उप प्राचार्य सुनीता पाटील ,स्पोर्ट्स हाउसचे आमिर शेख उपस्थित होते. मुलांचा अंतिम सामना विवेकानंद इंग्लिश मेडियम विरुद्ध सेंट जोसेफ यात खेळला गेला व त्यात सेंट जोसेफ १-० विजयी ठरला.प्रास्ताविक सचिव फारूक शेख यांनी केले, आभार प्रा डॉ अनिता कोल्हे यांनी मानले व सूत्रसंचालन अब्दुल मोहसीन यांनी केले.  स्पर्धेचा निकाल मुली : रायसोनी मराठी स्कूल वि.वि.सेंट. जोसेफ  १-०. रायसोनी ई.स्कूल वि.वि.ए.टी झांबरे १-०. उपांत्य फेरीत पोदार इंटरनॅशनल स्कूल वि.वि.रायसोनी ई.स्कूल १-० . ओरीयन CBSE स्कुल वि.वि.रायसोनी मराठी स्कूल ४-२ ( पेनल्टी )  अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल वि.वि. ओरीयन CBSE स्कुल १-० . स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून तेजस मोरे, अभिषेक पहुरकर, अजय वर्चे, कौशल पवार, आकाश कांबळे, धनंजय धनगर, दीपक सस्ते, शुभ मुंदळा, पवन सपकाळे,संजय कास्‍देकर,अर्पित वानखेडे, गिरीश खोंडे,लियाकत अली हे काम पाहत आहे.

Exit mobile version