Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला मध्यरात्री फूस लावून पळविले

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून  पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी रात्री ११ ते मध्यरात्री १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेण्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध घेऊन तपास सुरू केला, परंतु मुलगी कुठेही आढळून आले नाही. याबाबत पीडितेच्या आईने वारणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहे.

 

Exit mobile version