यावलचा आठवडे बाजार भरण्यास सुरूवात

यावल  प्रतिनिधी- मात्र शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर प्रथमच आठवडे बाजार आज भरला त्यास मात्र नागरीकांचा अत्यंत अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे 

कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीच्या गोंधळा संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात सर्वत्र थैमान घालणाऱ्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील ६ महीन्यापासुन प्रशासनाने आठवडे बाजार पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले होते. 

मात्र शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर प्रथमच आठवडे बाजार आज भरले त्यास मात्र नागरीकांचा अत्यंत अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे . सहा महीन्याच्या कालावधीनंतर शासनाच्या वतीने अनलॉक जाहीर झाल्याने आज दिनांक १६ ऑक्टोबर पासुन पुनश्च शुक्रवारच्या दिवसी आठवडे भरण्यास सुरूवात झाली असुन, कोरोना भितीच्या सावटाखाली भरलेल्या बाजारास व्यापारी , शेतकरी आणी जिवनावश्यक वस्तु खरेदी करणारे नागरीकांची अत्यल्प उपस्थिती हे प्रकर्षाने दिसुन आली.

आठवडे बाजारात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे या दृष्टीकोणातुन यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विशेष लक्ष ठेवुन होते .

Protected Content