Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : बाप्पाच्या आगमनाने जळगावमधील बाजारपेठ फुलली (व्हीडीओ)

DSC 7677

 

जळगाव (प्रतिनिधी) ‘श्रीं’च्या स्वागतासाठी संपूर्ण जळगावनगरी सज्ज झाली आहे. सर्वांचेच लाडके दैवत विघ्नहर्त्या गणरायाचे आज घरोघरी आगमन होत आहे. अवघ्या शहरात ‘श्रीं’च्या आगमनाचा उत्साह संचारला असून बाजारपेठ फुलल्या आहेत.

 

‘श्रीं’च्या स्वागतासाठी संपूर्ण सुवर्णनगरी सज्ज झाली आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत विघ्नहर्त्या गणरायाचे आज (दि. १३) घरोघरी आगमन होत आहे. अवघ्या खान्देशवासीयांमध्ये ‘श्रीं’च्या आगमनाचा उत्साह संचारला आहे. जळगावात सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणेशोत्सवासाठी देखावे तयार करण्यात येत आहे.

 

आज श्री स्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. संपूर्ण खान्देशातच गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. जळगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील फुले मार्केटसह गणेश कॉलनी चौक, महाबळ कॉलनी स्टॉप, अजिंठा चौफुली परिसरात मूर्ती विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात नव्या लूकमधील गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. घरगुतीसह मोठ्या मंडळाकडूनही या मूर्तींना पसंती आहे. गणेश स्थापनेच्या दिवशी सकाळपासूनच बाजार गणेशभक्तांच्या गर्दीने फुलली असल्यामुळे पोलिसांनीही वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत.

 

Exit mobile version