Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुंतवणकीत नफा मिळवून देण्याचे आमिष: बांधकाम व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेगवेगळे करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवून रामदास कॉलनीतील राहणारे बांधकाम व्यावसायिक सौरभ शरद जोशी यांची १० लाख ४१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील रामदास कॉलनी परिसरात बांधकाम व्यावसायिक असलेले सौरभ जोशी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सौरभ जोशी यांच्या व्हाटस् अप व टेलिग्राम क्रमांकावर २८ जून ते ४ जुलै २०२३ या दरम्यान अज्ञात व्हाटस् अपवरून व टेलिग्राम आयडीवरून वारंवार संपर्क साधला. त्यात त्यांना युजर आयडी व पासवर्ड तयार करायला सांगत जोशी यांचा विश्वास संपादन केला. त्यावेळी त्यांना प्रीपेड टास्क व क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर युपीआय आयडी व बँक खात्यामध्ये वेळोवेळी १० लाख ४१ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी ते जमा केले. मात्र त्याबदल्यात कोणताच मोबदला मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौरभ जोशी यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जळगाव सायबार पोलीस ठाण्यात अज्ञात व्हाटस् अप क्रमांक टेलिग्राम आयडी वापरणाऱ्यांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बी.डी. जगताप हे करीत आहेत.

Exit mobile version