Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निसर्गाची हानी म्हणजे बाप्पांचा अपमान – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज (व्हिडीओ)

फैजपूर ता. यावल (निलेश पाटील) । प्रकृतीसाठी बाप्पा पूरक आहे, मग बाप्पाच्या निमित्ताने प्रकृतीला, निसर्गाला हानी पोहचवू शकत नाही, निसर्गाची हानी म्हणजे बाप्पांचा अपमान असल्याचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी सांगितले की गणेश विसर्जन करताना दोन पर्याय त्यांनी यावेळी सुचवले, एक पहिला पर्याय घरीच एखाद्या टपात पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन करावे व ते पाणी पायाखाली येणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तसेच फैजपूर शहरासाठी सतपंथ चारीटेबल ट्रस्टतर्फे विविध ठिकाणी संकलन करण्यात येणार आहे. सर्व गणेशमूर्ती संकलन करून मी स्वतः विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच निर्मले सुद्धाच संकलन केंद्राकडे देण्याचे आवाहन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी ‘लाईव्ह ट्रेडस न्यूज’ च्या माध्यमातून केले.

 

Exit mobile version