Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्रीपदाआधी ध्वजारोहण करणार्‍या मंत्र्यांची यादी जाहीर !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रीमंडळाचे खातेवाटप आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी जाहीर करण्याआधीच राज्य सरकारने आगामी १५ ऑगस्ट रोजी कोणता मंत्री कुठे झेंडा फडकावणार हे जाहीर केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्य दिनाला कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. यानुसार जळगावात गुलाबराव पाटील तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे झेंडा फडकावणार आहेत. अन्य जिल्ह्यांमधील संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.

 

देवेंद्र फडणवीस – नागपूर

 

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

 

चंद्रकांत पाटील – पुणे

 

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर

 

सुधीर मुनगंटिवार – चंद्रपूर

 

गिरीश महाजन – नाशिक

 

दादा भुसे – धुळे

 

गुलाबराव पाटील – जळगाव

 

रवींद्र चव्हाण – ठाणे

 

दीपक केसरकर – सिंधुदुर्ग

 

उदय सामंत – रत्नागिरी

 

अतुल सावे – परभणी

 

संदिपान भुमरे – औरंगाबाद

 

सुरेश खाडे – सांगली

 

विजयकुमार गावित – नंदुरबार

 

तानाजी सावंत – उस्मानाबाद

 

शंभूराज देसाई – सातारा

 

अब्दुल सत्तार – जालना

 

संजय राठोड – यवतमाळ

 

अमरावती येथे विभागीय आयुक्त ध्वजारोहण करणार.

 

कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

Exit mobile version