Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले जीवदान

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तोंडापूर गावाजवळील टाका शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेतकरी व वनविभागाच्या वतीने जीवदान मिळाले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील टाका शिवारात अजिंठा लेणी डोंगररांग मध्ये वावरणाऱ्या वन्यप्राणी बिबट्या भक्ष्याच्या शिकार करताना रात्रीच्या वेळी तोंडापूर येथील मध्यम प्रकल्पाच्या बाजूला भिसन मांग याच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. शेत करणाऱ्रूा कदिर शेख हे ३० जानेवारी रोजी सकाळी शेतात  कामासाठी गेले असता विहिरिवर पाणी काढण्यासाठी गेले असता विहिरीत पडलेला बिबट्या  दिसून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचारी शब्बीर पिंजारी यांना कळविले. वनविभागाचे अधिकारी ,  वनक्षेत्रपाल अमोल पंडित यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.  विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेताच्या शेतकरी शफिक शेख, वनपाल पी.व्ही. महाजन, वनसरक्ष पी.बी. काळे, वनसेवक शब्बीर पिंजारी, वनसेवक मयुर पाटील, रमजान पिंजारी,  दिलीप तडवी, वाचमन एकनाथ कोळी यांनी लाकडी शिडी एकमेकांना बांधून दोरीच्या साहाय्याने विहिरीत सोडण्यात आली. रात्रभर विहिरीच्या कड्यावर बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत बिबट्याने जीवाची पर्वा न करता सीडीने वर चढून जंगलाच्या दिशेने जोरात पळ काढला. शेतकऱ्यांच्या सतर्कता मुळे व वनविभागाच्या कर्मचारी यानी बिबट्याला जीवदान मिळाले.

Exit mobile version