Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कायदा समान, चितळेला अश्लील लिहिणाऱ्यावर कारवाई करा- चित्रा वाघ

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यावरून अभिनेत्री चितळेविरुद्ध कारवाई झाली आहे.  तर  सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रिया केल्या जात आहेत, यावरून कायदा सर्वाना समान असून चितळेला सोशल मिडीयावर अश्लील लिखाण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याच्यावर सोशल मिडीयावर वाद्ग्रस्त पोस्ट केले. यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.  यासंदर्भात तिला शनिवारी अटक करण्यात आली. त्यांनंतर चितळेला आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावर चितळेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, तर आता चितळेवर सोशल मिडीयावर अश्लील लिखाण केले जात असून उघड उघड जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मर्दावर आणि रणरागिणीवर देखील रीतसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करा,  कायदा सर्वांसाठी समान आहे, अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Exit mobile version