Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूण मुलगा गमावलेल्या कोळी दांपत्याला मंगळग्रह सेवा संस्थेकडून मिळाला रोजगार

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यामध्ये भरत कोळी यांचा हाताशी आलेला युवा पुत्राचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, या दाम्पत्यांना रोजगार नसल्यामुळे मंगळग्रह सेवा संस्थेकडून रोजगार मिळाला आहे.

तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यामध्ये भरत कोळी यांचा हाताशी आलेला युवा पुत्र बुडून त्याचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी पिता भरत व माता भारती कोळी यांनी सातत्याने पोलिस व प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याबाबत कोणावरही कारवाई करणे पुरावे आणि तत्सम तांत्रिक बाबींचा अभावी पोलिस आणि प्रशासनाला शक्य झाले नाही. अखेरीस या बाबीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी कोळी दाम्पत्याने २६ जानेवारीला कचेरी बाहेर आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यांची समजूत काढली. हाताशी आलेला व रोजगारासाठी सक्षम असलेला मुलगा गमावल्याचे मोठे दुःख या दांपत्याला होते. त्यावर आम्ही तुमच्या रोजगारासाठी एखाद्या समाजसेवी संस्थेला किंवा दानशूर व्यक्तीला आवाहन करतो. जेणेकरून तुम्हाला काहीतरी रोजगार उपलब्ध होईल, असे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी त्या दांपत्याला सांगितले. त्याच वेळी तेथे बातमीसाठी ‘लोकमत’ चे प्रतिनिधी तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपस्थित होते. प्रांताधिकारी आहिरे यांनी याबाबत श्री.महाले यांना विचारणा केली. श्री.महाले यांनी तत्काळ होकार दिला. कोळी दांपत्याला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे ॲड. अभिजीत बिऱ्हाडे त्यांनीही दाम्पत्याचे मन वळविले. महाले यांनी दाम्पत्य व ॲड. बिऱ्हाडे यांना सांगितले की, तुम्हास रोजगारासाठी जे काही हवे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही ते तुम्हाला घेऊन देऊ. तसेच तुमच्या दुसऱ्या मुलाने आर्थिक बिकटते मुळे बारावीनंतर शिक्षण सोडून दिले आहे. त्याची शिकायची तयारी असल्यास त्याला सर्व प्रकारची शैक्षणिक मदतही करू, दुसऱ्या दिवशी कोळी दांपत्य व ॲड. बिर्‍हाडे यांनी रोजगारासाठी चक्की घेण्याचा निर्णय घेतला. तसे महाले यांना कळविले. त्यांनी तत्काळ होकार दिला. त्यांना चक्की घेऊन दिली. चक्की विकत घेतल्याची पावती प्रांताधिकारी अहिरे यांच्या हस्ते कोळी दांपत्यास दिली.

याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन .पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिररराव, जयश्री साबे तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश वाल्हे, शितल देशमुख, ॲड. अभिजित बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. कोळी दांपत्य, ॲड. बिऱ्हाडे व प्रांताधिकारी अहिरे यांनी मंगळग्रह सेवा संस्थेला धन्यवाद दिले.

Exit mobile version