Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्यावरण समृद्धीसाठी युवकांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत : डॉ.प्रविण भोकरे 

WhatsApp Image 2019 07 22 at 8.03.08 PM

चाळीसगाव , प्रतिनिधी | शहराचा वाढता विस्तार, वृक्षांची होणारी तोड यामुळे शहरांच्या निसर्गसौंदर्यावर, पर्यावरणावर व हवामानावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत असतांना युवकांनी वृक्षलागवडीसाठी घेतलेला पुढाकार आदर्शवत असा राहिला आहे असे प्रतिपादन डॉ.प्रविण भोकरे यांनी केले. ते युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षलागवड कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी वामनराव देशमुख, भगवंतराव काटकर, आबा पुरकर, देविचरण काटकर, कैलास पाटील, अनिल गोरे, किरण सपकाळ, शामकांत देशमुख, सुजित काटकर, राहुल दाभाडे, कुशल बिडे, दुर्गेश जाधव, विनीत गवळी, राहुल पाटील, सचिन दाभाडे, निसार सैय्यद, संभाजी सैंदाणे, अरविंद पाटील, हर्षल देशमुख आदी उपस्थित होते.’निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष संवर्धनाचा’ हे ब्रीद जोपासत वृक्ष लागवडीसोबत त्याचे संवर्धन करण्यासाठी युवकांनी एकजुटीने पर्यावरणाची शान राखत मानवनिर्मित संकटावर मात करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. सामाजिक दृष्टीकोन ठेवून युवकांनी वृक्षलागवड चळवळीतून नवा आयाम रुजविला असल्याचे डॉ. भोकरे यांनी सांगितले. हिरापूर रोड स्थित शिवाजी नगर येथे स्व.प्रशांत वामनराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले.वृक्ष संवर्धन अभियान मनिष मेहता, सतीश जैन, हेमंत वाणी, भूपेंद्र शर्मा, राकेश राखुंडे, निरज कोतकर, स्वप्निल धामणे, विशाल गोरे, मनीष ब्राह्मणकर, पियुष सोनगिरे, अभय राजपूत, संजय दायमा, पराग बागड, स्वप्नील कोतकर, गितेश कोटस्थाने, गणेश सूर्यवंशी, प्रवीण बागड, बाळासाहेब शेंडे, निशांत पाठक, विनोद चौधरी, इशू वर्मा, भूषण भामरे, निलेश सेठी, युवराज शिंपी, शाम मेतकर, योगेश ब्राह्मणकर, निलेश शेंडे आदी युनिटी सदस्यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.

Exit mobile version