Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा आणि किनगाव येथील रुग्णालयाचे ऑनलाईन पध्दतीने पंतप्रधानांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला होणार लोर्कापण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा ता. रावेर जि. जळगांव येथे नवीन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे आणि किनगांव ता. यावल जि. जळगांव येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दि. 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जळगांव जिल्हयातील सावदा ता. रावेर येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते. सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत ३० खाटांची असून दोन मजली आहे. त्यात तळमल्याचे क्षेत्रफळ १८००० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ ११,३०० चौरस फुट असे एकुण २९,३०० चौरस फुटाची इमारत आहे. तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत. अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण २४ असुन वर्ग-१ चे एक, वर्ग-२ चे तीन, वर्ग-३ चे आठ व वर्ग-४ चे १२ निवासस्थान आहे.

जळगांव जिल्हयातील किनगाव ता. यावल येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते. या इमारतीचे तळमल्याचे क्षेत्रफळ १३२५० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षे. १३,२५० चौरस फुट असे एकुण २६,५०० चौरस फुटाची ची इमारत आहे. तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग, आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण १२ असुन वर्ग-२ चे चार, वर्ग-३ चे आठ निवासस्थान आहे. अशाप्रकारे आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार दि. 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Exit mobile version