Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात साकारली साडेपाच फुटाची बुद्ध मूर्ती ; भिवसने बंधुची कलाकृती

gautam budha pachora 1

पाचोरा (प्रतिनिधी) येथील भिम नगरमधील शिल्पकार भिवसने बंधुनी तथागत गौतम बुद्धांची साडेपाच फुटांची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती पाचोरा शहरातील समाज बांधवाची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. पाचोरा एम.एम.काॅलेजचे माजी वरिष्ठ लिपीक यशवंत देवचंद भिवसने व त्यांचे लहान बंधु राजेंद्र देवचंद भिवसने या दोन्ही शिल्पकारानी मूर्ती तयार करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार अवघ्या पंधरा दिवसात मूर्ती तयार झाली असून आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने लुंबीनी बुध्द विहारात मुर्तीची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे.

 

बुद्ध मूर्ती बनविण्याचे कामास एप्रिलमध्ये सुरुवात करण्यात आली. तब्बल पंधरा दिवसात साडेपाच फुटांची मूर्ती सिमेंटची असून ध्यान मुद्रा अवस्थेतील शिल्प भिवसने बंधुनी साकारले आहे. त्यांनी ही मूर्ती धम्मदान म्हणून दिली आहे. चित्रकलेची आवड असलेल्या भिवसने बंधुनी आपल्या शिल्पकलेला तथागतच्या मूर्तीपासून सुरुवात केली. त्यांना चिञकलेची आवड लहानपणा पासूनच आहे. बुद्धांचा शांतीचा संदेश व त्यांचे अनुकरण समाजात रुजतील. यासाठी पाचोरा येथे बैठक घेऊन येथील विहाराच्या आवारात मूर्ती बनवण्याचा त्यांनी संकल्प केला होता. ध्यान मुद्रा अवस्थेतील मूर्ती परिसरातील सर्वाचे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे, मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय.

 

पाचोरा येथील भिमनगर येथील भिवसने बंधुनी बुद्ध मुर्ती साकारुन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मुर्ती कलेचे कुठलेही शिक्षण व प्रशिक्षण घेतलेले नसतांना देखील आपल्या जिद्दीने व आत्मविश्वासाने तब्बल साडेपाच फुट उंचीच्या बुद्ध मुर्ती ही ध्यान मुद्रा अवस्थेत आहे. त्यांच्या ह्या शिल्पकलेचे पाचोरा शहरातुन कौतुक होत आहे. सदर मुर्ती बनविण्यासाठी भिवसने बंधुनी कुठलाही मोबदला घेतलेला नसून धम्मदान रुपाने ती बुध्द मुर्ती लुंबीनी बुध्द विहार समिती भिमनगर यांना दिली आहे.

 

अशी साकारली बुध्दाची मुर्ती

बुद्धांची मुर्ती अवघ्या पंधरा दिवसात साकारली गेलीय. ही मुर्ती साकारण्यासाठी सिमेंट, लोखंड,खडी, व विटाचे तकडे, रंगकाम आदी साहित्याचा वापर करुन ध्यान मुद्रा अवस्थेत असणारी ही मूर्ती तब्बल साडेपाच फुटाची आहे.

 

आज शहरातील बस स्थानकाच्या शेजारी भिमनगर येथे मुर्ती स्थापनेचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास औरंगाबाद येथील भंते बुध्दरत्न भंन्ते यांच्या शुभ हस्ते बुध्द मुर्ती पुजन व स्थापना करण्यात येणार आहे. तरी पाचोरा शहरातील सर्व समाज बांधवानी या भव्य कार्यक्रमास हजर राहावे. असे आवाहन लुंबीनी बुध्द विहार समिती भिमनगर पाचोरा यांनी केले आहे. यावेळी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Exit mobile version