Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात पावसामुळे घर कोसळले : जीवित हानी नाही (व्हिडीओ)

5e4a5feb e098 4f50 8834 5894cc7295d8 1

भुसावळ, प्रतिनिधी | येथील खडका रोडवरील मण्यार हॉलजवळ काही वर्षांपासून पडाऊ झालेले एक घर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काल (दि.२६) रात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या घराचा काही भाग पावसामुळे पडला असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

 

अशा धोकादायक पडीत घरांना नगर पालिकेतर्फे नोटीस लावण्यात आलेल्या नाहीत, तसेच घर मालकांनीही कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. हे घर जर दिवस पडले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे नगरपालिका व अशा घरांच्या घरमालकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत.

 

 

Exit mobile version