भोरटेक येथे घराला आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक; सव्वा लाखाचे नुकसान

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या भोरटेक खु” येथील गोपीचंद चांभार या शेतमजूर कुटुंबाचे घर आगीत जळून खाक झाले असून त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नसून एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

भोरटेक ता. पाचोरा येथील गोपीचंद महादू चांभार हे भूमिहीन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नीसह मुले बाहेरगावी गेले होते. व ते मजुरी साठी  बाहेर गेले असता दसऱ्याच्या दिवशी घरात दिवा लावला होता व त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली असून घरातील संसारोपयोगी वस्तू, रोख रक्कम, अन्नधान्य, शालेयोपयोगी कागदपत्रे व अन्य वस्तू या आगीत जळून खाक झाले असून कुटुंब अगदी रस्त्यावर आले आहे.

सरपंच यांनी तलाठी यांना संपर्क करून संबंधित आगीचा पंचनामा केला आहे. या ठिकाणी जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी १६ रोजी भेट देऊन पाहणी केली व कुटुंबप्रमुख गोपीचंद चांभार यांस पाच हजार रुपयांची रोख रक्कम देऊन कुटुंबाला एकप्रकारे आधार दिला आहे. तसेच याविषयी आमदार किशोर पाटील, तहसिलदार कैलास चावडे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली व शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी असे सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत सरपंच गुलाब चांभार, उपसरपंच श्रावण पाटील, दिपक पाटील, ग्रामसेवक समाधान पवार, भारत पाटील, गोकुळ पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content