Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 23 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधाचे बळकटीकरण करण्यात आले आहे. तसेच नवजात बालकांसाठी व्यापक स्तनपान केंद्र, या बरोबर आठ नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. व मंत्री ग्राम विकास व पंचायत राज गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा.उन्मेश पाटील,आ.सुरेश दामु भोळे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत दि.०३.०३.२०२४ रोजी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे होणार आहे. तरी नागरीकांना उपस्थितीचे आवाहन मा. जिल्हाधिकारी, जळगांव व जिल्हा शल्य चिकित्सक, जळगांव यांनी कलेले आहे.

अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे सकाळी 8.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन समिती, जळगांव या कार्यालयाकडुन मंजुर करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ मधुन नाविण्य पुर्ण योजना (शास्वत विकास ध्येय) अंतर्गत जिल्हा रुग्णालय जळगांव अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा २३ आरोग्य संस्था व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगांव यांचे अधिनस्त ७७ आरोग्य संस्थांमध्ये ऑपरेशन थिएटर, रक्त साठवण केंद्र व रुग्णालय बळकटीकरण करणेसाठी आवश्यक १ ते २७ बाबी खरेदी करण्यात आल्या असू न त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत दि.०३.०३.२०२४ रोजी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे होणार आहे.

Exit mobile version