Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीसाठीचे डोक्यावर कर्ज असल्याच्या विवंचनेतून लमांजन येथील एका शेतकऱ्यांने कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास भिवसन पाटील वय ५० रा. लमांजन ता.जि.जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लमांजन येथे कैलास भिवसन पाटील हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्या सोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्जबाजारीमुळे विवंचनेत होते. त्यांच्यावर खासगी आणि सोसायटीचे कर्ज होते. या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान कुऱ्हळदे ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४०१च्या १९ जवळ धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. ही बाबत लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशनचे मास्टर यांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता मयताची ओळख पटविली.

Exit mobile version