Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाऊंच्या उद्यानातील सुरक्षा रक्षकांचा असाही प्रामाणिकपणा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात लहान थोर हे फिरण्यासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी अनेकजण येत असतात. यात सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी महिलावर्गांची संख्या अधिक असते. त्यातच भाऊंच्या उद्यानातील सुरक्षा रक्षक व अधिकारी यांच्याकडून प्रामाणिकपणाचे दर्शन पहायला मिळाले. मॉर्निंक वॉक करण्यासाठी आलेल्या महिलेची सहा ग्रॅमची हरविली होती. ती मंगलपोत सुरक्षा रक्षकाला सापडल्याने शहीनिशा करून मंगलमोल मुळ मालक महिलेला सर्वाच्या उपस्थितीत देण्यात आले. दरम्यान, महिलेचा मंगलपोत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांचे आभार मानले.

याबाबत अधिक असे की, काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजेच्या सुमारास रूपाली भावसार या महिला मॉर्निंग वाक करण्यासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत गळ्यातून कुठेतरी पडली. दरम्यान, त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत पडल्याचे रूपाली भावसार यांच्या लक्षात आले. त्यांनी भाऊंच्या उद्यानात येवून सर्वत्र पाहणी केली. शिवाय त्यांनी या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला व विचारपूस केली. त्यानंतर विजय चव्हाण यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मंगळसुत्र शोधायला सुरूवात केली. त्यानंतर शोध घेत असतांना कर्मचारी मनोहर तायडे यांच्या सोन्याचे मंगळसुत्र मिळून आले.

मंगळसुत्र मिळाल्यानंतर दुसरे सुरक्षा कर्मचारी सोमनाथ बडगुजार यांनी शहानिशा करून मंगळसुत्र सुरक्षा कर्मचारी विजय चव्हाण यांच्या ताब्यात दिले. दरम्यान मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भाऊंच्या उद्यानातील सर्व कर्मचारी यांच्या समोर रूपाली भावसार याना सापडलेले मंगळसुत्र परत देण्यात आले. यासंगी सुरक्षा कर्मचारी विजय चव्हाण, सोमनाथ बडगुजार, मनोहर तायडे, हेमंत बाविस्कर, गार्डन विभागाचे मंगलसिंग राठोड, सफाई कर्मचारी पुष्पाबाई, भारतीबाई आणि प्रमिलाबाई यांची उपस्थिती होती.

Exit mobile version