Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैश्यांवरून तरूणाच्या डोक्यात टाकली सळई

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  उसनवारीने घेतलेले पैसे दिले नाही या कारणावरून तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी सळईने डोक्याला मारून गंभीर दुखातप केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे रविवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र दिलीप पाटील वय-३१ रा. वाकटुकी ता.धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. राजेंद्र पाटील यांच्या  वडीलांनी गावात राहणारे संदीप पितांबर पाटील यांच्याकडून काही पैसे उधारीने घेतले होते. रविवारी १७ डिसेंबर सकाळी ९ वाजेच्या सुमारास संदीप पाटील याने पैसे मागितले. त्यावरून राजेंद्र पाटील याला संदीप पितांबर पाटील, चंद्रकांत पितांबर पाटील, रामदास अर्जून पाटील सर्व रा. वाकटुकी या तिघांनी बेदम मारहाण केली. तर एकाने हातातील लोखंडी सळई  राजेंद्र पाटील यांना मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार संदीप पितांबर पाटील, चंद्रकांत पितांबर पाटील, रामदास अर्जून पाटील सर्व रा. वाकटुकी ता. धरणगाव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मोती पवार हे करीत आहे.

Exit mobile version