Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव शहरातील रस्ता व पाण्याची पालकमंत्र्यांनी दुचाकीवरून पाहणी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव शहरामध्ये अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत.  त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याची पुर्ण कल्पना पालकंत्री गुलाबराव पाटील यांना आहे. त्यामुळे दुचाकीवर बसून गावातील रस्ता व पाण्याची पाहणी केली.

 

अनेक तांत्रिक अडचणीमुळे पाईपलाईन बद्दलच्या कामाला विलंब होतो आहे,  अजून प्रतीक्षेनंतर काही दिवसात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. पाईपलाईन संपूर्ण गावाची बदलून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेकअप झाल्यावर पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटून एक-दोन दिवसात पाणी मिळत जाईल पूर्वी शहराचे जसे रस्ते होते तसेच रस्ते दुरुस्त केले जातील. धरणगाव मुख्याधिकारी व पाईपलाईनचे ठेकेदार यांना तात्काळ हे काम मार्गी लावून जनतेच्या समस्या सोडाव्यात असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी केले.

 

या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, नगरपालिका गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विजय महाजन, शहरप्रमुख विलास महाजन, भैय्या महाजन, हेमंत चौधरी, बुट्या पाटील, संतोष महाजन, बाळासाहेब जाधव, हेमंत महाजन, नागराज पाटील, रवींद्र कंखरे, प्रशांत देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version