Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना रूग्णसंख्येचा वाढता आलेख कायम

नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशात सध्या कोरोना रुग्णांची  आकडेवारी वाढत जात असून,  काल देशात 3,37,704 नवे रुग्ण  आढळून आले आहेत. तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 37 हजार 704 नवीन रुग्ण आढळले असून 488 जणांचा मृत्यू झाला आहे. काल ही दैनंदिन रुग्णवाढ तीन लाख 47 हजार 254 इतकी होती. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारांच्या 10 हजार 50 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 17.22 टक्के इतका आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या 21 लाख 13 हजार 365 झाली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 88 हजार 884 झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात दोन लाख 42 हजार 676 लोक बरे झाले. तसेच आतापर्यंत तीन कोटी 63 लाख 1 हजार 482 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. तरी सकारात्मक बाब अशी की, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र असं असलं तरी एकुण आलेखाचा विचार केल्यास रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 161 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 67 लाख 49 हजार 746 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 161 कोटी 16 लाख 60 हजार 78 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

 

 

Exit mobile version