Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षणाधिकारी यांना धक्काबुक्की

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक सुरू असताना गटशिक्षणाधिकारी यांना धक्काबुक्की व अश्लिल शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना मंगळवार १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकारणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकारी यांनी मंगळवार १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेतली. या बैठकीत अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शाळेचे संस्था चालक भटू मुरलीधर पाटील यांना बोलविलेले नसतांना देखली भटू पाटील हे बैठकीला आले. दरम्यान यावेळी गटशिक्षणाधिकारी या नात्याने रावसाहेब मांगो पाटील यांनी भूट पाटील यांना शाळेतून सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेसाठी दाखला न देण्याच्या कारण विचारले. याचा राग आल्याने जवखेडे येथील शाळेचे संस्थाचालक भटू पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांना धक्काबुक्की करत डोळ्यावर मारले. तसेच उपस्थित असलेल्या सभासदांच्या समोर अश्लिल शिवीगाळ धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी ४ वाजता जवखेडा येथील शाळेचे संस्थाचालक बटू मुरलीधर पाटील यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे हे करीत आहे.

Exit mobile version