Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पडद्यामागच्या कोविड योध्यांच्या सरस कामगिरीमुळे कोविड रूग्णांना दिलासा

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयातील पडदयामागच्या कोविड योध्यांनी केलेला सरस कामगिरीमुळे कोविड रूग्णांना दिलासा मिळत आहे.

आधिच जिवघेणा कोरोना झाल्यामूळे त्रस्त कोविड रूग्ण व नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत उपचार मिळवण्यासाठी कागदपत्र व अटींची पुर्तता करावी लागत होती. अनेकांना माहिती नसल्याने दाखल होण्यास अडचण येउन मनस्ताप सहन करावा लागल्याचे दिसून येतांना शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविड रूग्णांना मोफत उपचार उपलब्ध असतांना ब—याच रूग्णांना याची माहिती नसल्याने दाखल होतांना कागदपत्र सोबत नसायची, सामान्य रूग्णालय, पी एस सी सेंटरमधून येतांना शिफारस पत्रही सोबत नसायचे अशावेळी या रूग्णांची हेळसांड होउ नये म्हणून कार्यालयीन कर्मचारी सोशलमिडीयाच्या माध्यमातून ही कागदपत्र मागवत त्या रूग्णांचा प्रवेश व तातडीचे उपचार सूरू करण्यास युध्दपातळीवर मदत करत होते. 

अनेक रूग्णांच्या कागदपत्रातील त्रुटी, अथवा खाजगी रूग्णालयातून यायचे असल्यास दयावे लागणारे नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र, अत्यंत गरीब रूग्णांना महागडी इंजेक्शन औषधी उपलब्ध करून दयायची असल्यास कागदपत्रांची पुर्तता तसेच कोविड रूग्णांचे मेडीक्लेम, मृत्यु दाखला, कोविडमुक्त झाल्यानंतर करावयाच्या कागदपत्राच्या पुर्ततेबाबत या कोविड योध्दयांनी डॉक्टर व परिचारीका यांच्या सोबत युध्द पातळीवर काम केले. डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयातील पडदयामागच्या कोविड योध्यांनी केलेल्या सरस कामगीरीमूळे रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळत आहे. 

या टीममध्ये नरेंद्र रामदास नेमाडे, मिलींद सूरेश पाटील, राधेशाम दिनकर पाटील, हेमंत अनिल ढाके, निखील अरूण चौधरी, भारती युवराज चौधरी,किशोर मोहन खलसे, युवराज ज्ञानदेव पाटील,गणेश नांदूरकर,गजानन जाधव, रोशन महाजन, परेश बोरोले,राजू धांडे, गुणवंत कोल्हे, गोपाळ नांदुरकर, बापू नेमाडे, राजू राणे, सागर जैन गोलू,मोहन मयुर, दत्ता आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version