Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोंगरकठोरा येथील पडक्या विहिरीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील बेघर वस्तीच्या रहिवासी परिसरात असलेल्या कोरड्या व पडक्या विहीरीमुळे नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे अशी तक्रार नागरीकांनी केली आहे. 

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा गावातील ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बेघर वस्तीच्या रहिवास क्षेत्रात मागील १५ वर्षापासुन काही कुटुंब राहात आहे. या लोकवस्तीच्या अगदी जवळ मध्यभागी असलेली अत्यंत जुनी कोरडी विहीर असुन मागील काही दिवसांपासून ही अत्यंत खोल असलेली कोरडी विहीर खालील भागापासून सतत कोसळत असल्याने तात्काळ तिला बुजावी, अन्यथा या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांच्या जिवीतास धोका आहे. या परिसरात राहणारे नागरीकांमध्ये आपल्या लहान मुलं बाळासह कुटुंबाच्या सुरक्षेच्या विषया वरून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . दरम्यान या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांनी या विषयी डोंगर कठोरा ग्रामपंचायती कडे वारंवार तक्रारी केल्या असुन , पंचायतीचे या गंभीर प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असुन या ठीकाणी विहीरीच्या आजुबाजुस राहणाऱ्या नागरीकांच्या विषया नेहमीच उडवाउडवीचे व वेळ काढुन जाण्याचे उत्तर नागरीकांना मिळत असुन , यावेळी पावसाळ्यात सदरची विहीर कोसळुन झालेल्या अप्रीय घटनेस पुर्ण जबाबदार डोंगर कोठारा ग्राम पंचायत असेल अशा स्वरूपाची लिखित तक्रार यावल पंचायत सामितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे करण्यात येणार असल्याची माहीती परिसरातील राहणाऱ्या नागरीकांनी सांगीतले .

Exit mobile version