Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसमध्ये चढतांना सोन्याची पोत लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नवीन बस स्थानक आवारात जामनेर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा सुभाष परखड (वय-४८) रा. गिरिजा कॉलनी, जामनेर या महिला आपले पती यांच्यासह वास्तव्याला आहे. शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी प्रतिभा परखड या महिला त्यांचे भाऊ राजेश पाटील यांच्यासोबत दिवाळी खरेदीनिमित्त जळगाव शहरात आलेल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रतिभा परखड या महिला त्यांचे भाऊ राजेश पाटील यांच्यासोबत जामनेर येथे जाण्यासाठी जळगाव ते कोऱ्हाडा बस लागली होती. त्यावेळी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली . दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर सर्व तर शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर सोन्याच्या पोत संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version