Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घोडसगाव प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत तुटल्याने बहुळा नदीला पुर

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर) जवळ असलेल्या घोडसगाव मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची सात फुट उंच, दगडी बांधकाम असलेली भिंत ३ फुट खचल्याने बहुळा नदीला पूर येऊ लागला आहे. भीतीमुळे येथे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बहुळा नदी काठच्या पिंपळगाव (हरेश्र्वर), भोजे, चिंचपुरे, सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी बु”, वरखेडी खु”, भोकरी, लासुरे, लोहारी बु”, लोहारी खु”, बिल्दी, वेरुळी बु”, वेरुळी खु” व दुसखेडा या गावांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे यांनी दिला असुन बहुळा प्रकल्पात दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने बहुळा प्रकल्पाखालील व नदी पात्राजवळील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव (हरेश्र्वर) ग्रामपंचायतीने घोडसगाव प्रकल्पाजवळ कर्मचारी तैनात केले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना उंच टेकडीवर असलेल्या जागी अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयात रात्रभर मुक्काम करावा असे आवाहन पिंपळगाव – शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी केले आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version