Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फुल विक्रेता वृध्दाची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोधडीवाला मार्केटसमोरून फुल विक्रेता वृध्दाची दुचाकी लांबविल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख ईमाम शेख अहमद वय-६५  रा. शनीपेठ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फुल विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीक्यू ३०८०) ही शहरातील गोधडीवाला मार्केट येथे पार्कींग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख इमाम यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.

Exit mobile version