Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देशातील पहिल्या ‘वहीगायन महोत्सवा’चे जळगावात आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच ह्या लोककलांची माहिती नव्या पिढीला मिळावी. तसेच काळाच्या ओघात नामशेष होणा-या या कलेला नवसंजीवन मिळावं. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने खान्देशात प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.

खान्देश हा विविध लोक साहित्य आणि परंपरेनी नटलेला प्रदेश आहे. खान्देशातील वहीगायन, सोंग, कानबाई गीतं, गोठ, सोगाड्या पार्टी, भगत भोपे आदी. लोककला ह्या परंपरेन चालत आलेल्या व खान्देशातील सण, उत्सव व मौखिक साहित्यातून निर्माण झालेल्या अस्सल लोककला आहे..

दि ४ मार्च ते ६ मार्च अशा तीन दिवस चालणा-या या महोत्सवाचे आयोजन जळगावात होत असून जळगावच्या नवीन बस स्थानका शेजारील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात या महोत्सवाचं आयोजन रोज सांयकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात आलं आहे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन होत आहे.

खान्देशातील लोककलावंना शासनस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावं. खान्देशातील पारंपारीक लोककलेच्या सन्मान व्हावा या लोककलेत कार्यरत कार्य करणा-या लोककलावंताचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन होत आहे

या महोत्सवात खान्देशातील नऊ वहीगायन मंडळे सहभागी होणार असून वहीगायन या लोककलेच्या सादरीकरणाने तीन दिवस हा महोत्सव रंगणार आहे या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार दि.४ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

महोत्सवाचे आयोजन व नियोजनासाठी शासनाच्या वतीने खान्देशातील लोककलेचे अभ्यासक, संघटक व लोककलावंत विनोद ढगे यांची समन्वयक म्हणून शासनाने निवड केली आहे. खान्देशात प्रथमच होत असलेल्या या महोत्सवात खान्देशातील लोककलेच्या संवर्धनासाठी या लोकलेला सन्मान मिळावा यासाठी तसेच ग्रामीण भागातील लोककलावंताचा कला अविष्कार पहाण्यासाठी जळगाव च्या कला रसिक नागरीकांनी या महोत्सवाला यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक बिभीषण चौरे यांनी केले आहे

Exit mobile version