Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 646 जणांनी घेतला कोवीशिल्डचा पहिला डोस

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील 25 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आज दिवसभरात 1 हजार 646 जणांना पहिली लस तर 524  जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 51 हजार 74 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून 900 हून अधिक बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून येत आहे.  कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 25 ठिकाणी लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज शनिवार 13 मार्च रोजी दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय- 263 , छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल- 199, गोल्ड सीटी हॉस्पिटल-0, गाजरे हॉस्पिटल-0, ऑर्किड हॉस्पिटल-0, जैन हॉस्पिटल-0, जामनेर-105, चोपडा-47, मुक्ताईनगर-123, चाळीसगाव-84, पारोळा-140, भुसावळ-0, अमळनेर-121, पाचोरा-87, रावेर-75, यावल-95, भडगाव-72, बोदवड-41, एरंडोल-107, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-0, धरणगाव-87, एम.डी. भुसावळ-0, खडका रोड केंद्र-0, यावल रोड भुसावळ केंद्र-0 आणि पीएचसी सेंटरवर 0 असे एकुण 1 हजार 646 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 524 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Exit mobile version