Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फुले मार्केटमधील दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचा मुद्देमाल खाक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सेंट्रल फुलले मार्केटमधील गोळ्या, बिस्किटांच्या दुकानाला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील फुले मार्केटमधील ग्राऊंड फ्लोअरला असलेले न्यू साई कृपा स्विट्स नावाच्या दुकाना रविवारी १३ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत लाखो रूपये किंमतीचे गोळ्या, बिस्किट जळून खाक झाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फुले मार्केटमधील काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी महापालिकेच्या अग्निशामन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशामन विभागाचे देविदास सुरवाडे, रोहीदास चौधरी, संतोष तायडे, भगवान पाटील यांनी घटनास्थळी दाखल होवून या पथकाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, दुकानमालकासह इतर व्यापार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

Exit mobile version