Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय चार वाजेच्या बैठकीत घेतला जाईल : मुनगंटीवार

4Sudhir Mungantiwar 36

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीत कुठलाही निर्णयापर्यंत आम्ही पोहचलो नाहीत. त्यामुळे, आज दुपारी 4 वाजता पुन्हा भाजपची ज्येष्ठ नेते मंडळी चर्चेला बसणार आहे. या चर्चेत सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

 

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, की भाजप कोअर कमिटीची बैठक दुपारी पार पडली. त्यामध्ये अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. यानंतर संध्याकाळी 4 वाजता पुन्हा कोअर कमिटीची बैठक होईल. यामध्ये होणारा निर्णय केवळ राज्यपालांनाच नव्हे, तर माध्यम आणि सामान्य जनतेसमोर जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version