आज ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणासह महत्वाच्या मुद्यांवरून निकाल येण्याची शक्यता असून यातून आगामी निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आधी कोरोनामुळे अनेक ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर राज्यातील सत्तांतर, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा तिढा आदींमुळे निवडणुका थांबल्या असून राज्यभरात अल्प अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची निवडणूक आदी विविध विषयांवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी ही वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. आज याची सुप्रीम कोर्टात तारीख आहे. आज याबाबत सकारात्मक निकाल लागल्यास निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अन्यथा सर्व निवडणुका दिवाळीनंतरच होतील असे मानले जात आहे.

Protected Content