Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : शेतकऱ्याला मारहाण करून लुटले; रोकडसह सोन्याचे चैन लांबविली

जळगाव प्रतिनिधी । केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या भोकर-भादली येथील शेतकऱ्याला अज्ञात पाच हल्लेखोरांना बेदम मारहाण करून  ५० हजाराची रोकडसह सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी जबरी हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. जखमी शेतकऱ्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

 

निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भोकर भादली ता. जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहीती अशी की,  निवृत्ती गंगाराम साळुंखे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने सायंकाळी ५ वाजता किनोद येथे गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर भादली येथे परतत होते. त्याच्यासोबत गावातील विठू उर्फ प्रकाश (पुर्ण नाव माहित नाही) हे देखील होते. भोकर ते किनोद रस्त्यावर अज्ञात पाच जणांनी निवृत्ती यांची दुचाकी अडविली. निवृत्ती यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यात हल्ले खोरातील एकाने हातातील काठी निवृत्ती यांच्या डोक्याला मारली त्यात ते जखमी झाले. त्यांच्या खिश्यातील ५० हजाराची रोकड आणि गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जबरी हिसकावून पोबारा केला आहे. जखमी अवस्थेत निवृत्ती यांनी त्यांचे चुलत भाऊ विजय गोपाल पाटील यांना फोनकरून घटनेची माहिती दिली. विजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी निवृत्ती पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version