Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात ‘रोजगार कौशल्य’ कार्यशाळा उत्साहात

SNIMAGE40598university 1

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्षमता विकास केंद्राच्यावतीने ‘रोजगार कौशल्य’ या विषयावर दि.१६ व १७ ऑक्टोबर या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रा.एल.ए.पाटील बोलत होते की, व्यावसायिक नैतिकता व शिष्टाचार शिकणे व स्वत:च्या क्षमता ओळखून त्यांचा वापर करुन आपले करीअर घडवणे आजच्या काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याचबरोबर
प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्य विकसनाचे महत्व विषद करुन विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणेसाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमात कार्यशाळेचे आयोजक तथा केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.ए.एम.महाजन, डॉ.मधुलिका सोनवणे, डॉ.रमेश सरदार, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.आर.आर.आर. चव्हाण व डॉ.अतुल बारेकर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यशाळेत व्यवस्थापकीय व व्यावसायिक कौशल्ये, स्वत:ची ओळख, परियच लेखन, गटचर्चा व मुलाखती या कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Exit mobile version