Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव येथील पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात

public school in Jalgaon

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील पिपल्स बँक व कै. रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित ज. पब्लिक स्कूलची (दि.९) रोजी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल “आर.जे.फूड प्रॉडक्ट्स” (R.J.Food Products) येथे नेण्यात आली होती.

या शैक्षणिक सहलीमध्ये ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहलीमध्ये पारले प्रॉडक्ट्स कसे बनविले जातात व त्यामध्ये कोणत्या प्रक्रिया वापरल्या जातात हे सांगण्यात आले. यावेळी सहलीतील विद्यार्थ्यांना “आर.जे.फूड प्रॉडक्ट्स”चे व्हिजीट को ऑरडीनर योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. सहल यशस्वीतेसाठी गायत्री लोणारी, प्राची कोल्हे व स्नेहा शिंपी यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version