Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डंपरने दूध संघाच्या दोन वाहनांना उडवले : एक ठार; तीन जखमी

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी । भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने जिल्हा दूध संघाच्या दूध वाहून देणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली असून या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झालेले आहेत.

यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की वेगाने धावणाऱ्या डंपरने राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा दूध संघाच्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. हा अपघात नवोदय विद्यालयाच्या समोर झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत. या अपघातामुळे मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या अपघातामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Exit mobile version