Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मद्यधुंद चालकाचा टॉवर चौकात धुमाकूळ

जळगाव प्रतिनिधी । मद्यधुंद कंटेनरच्या चालकाने आज रात्री टावर चौकात अनियंत्रितपणे वाहन चालवल्यामुळे बराच काळ गोंधळ उडाला. यात सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरात आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास एचआर ५५ एक्स-९७६६ या क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने टॉवर चौकात आला. तेथून शहर पोलीस स्थानकाकडे जाण्यासाठी त्याने टर्न घेतला तरी त्याला टर्न घेता आला नाही. यामुळे त्याने चौकातील सिग्नल तसेच सिग्नलच्या फाऊंटेशनला टक्कर देऊन नुकसान केले. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, शहर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले असता तो दारू प्यालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी परिसरात काही काळ खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

 

Exit mobile version