Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा न्यायालयाने चऱ्हाटे कुटुंबियातील चार जणांच्या हत्येप्रकरणी तीन जणांना सुनावली फाशीची शिक्षा

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोल्यातील बहूचर्चित चऱ्हाटे कुटुंबियाच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला. या खटल्यातील तीन आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अकोला जिल्हयातील अकोट न्यायालयाने या खटल्याचा १७ मे रोजी शुक्रवारी निकाल दिला. या प्रकरणातील हरिभाऊ राजाराम तेलगोटे, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे आणि मुलगा कुंदन हरिभाऊ तेलगोटे या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक मारेकरी मुलाचा समावेश असून तो अल्पवयीन आहे. सध्या बाल न्यायालय मंडळात त्यांचे प्रकरण सुरु आहे.

एडीच एकर शेतीच्या वादातून बहिणीने पतीच्या आणि दोन मुलांच्या मदतीने दोन सख्या भावांसह त्यांच्या दोन मुलाची हत्या केली होती. या प्रकरणात बाबुराव सुखदेव चऱ्हाटे आणि धनराज सुखदेव चऱ्हाटे, गौरव धनराज चाऱ्हाटे, शुभम धनराज चाऱ्हाटे असे चारही मृतकांची नावे आहे. मृत धनराज आणि बाबुराव यांची सख्खी बहिण द्वारकाबाई आणि पती हरिभाऊ आणि त्यांच्या दोन मुलांच्या मदतीने शेतीच्या वादातून 28 जून 2015 रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण खून केला होता.ही घटना 28 जून 2015 ची असून तब्बल 9 वर्षांनंतर न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.

Exit mobile version