Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा अभिमानच, हास्याचा विनाकरण विपर्यास केला जातोय : खा. रक्षाताई खडसे

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफिबाबत घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच आहे. विनाकारण खा.प्रीतम मुंडे आणि माझ्या हास्याचा विपर्यास केला जात, असल्याची प्रतिक्रिया खा.रक्षाताई खडसे यांनी आज दिली आहे. शेतकरी कर्जमाफिबाबत खा.डॉ.भारती पवार या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतांना रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसें यांना हसू आवरेनासे झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

 

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आटोपल्या नंतर पत्रकारांशी बोलतांना खा. रक्षाताई खडसे म्हणाल्या की, काही राष्ट्रवादीच्या मंडळीने हा व्हिडीओ व्हायरल करत त्यावर कमेंट दिल्या आहेत. परंतू मी एकनाथराव खडसे यांची सून आहे किंवा खासदार प्रीतम मुंडे या स्व.गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे म्हणून काही लोकं काहीही मुद्दे जोडत आहेत. डॉं.भारती पवार या सभागृहात पहिल्यांदा बोलत होत्या. उलट महाराष्ट्रातला कोणताही खासदार बोलत असला तर आम्ही सर्व जण पाठींबा देण्यासाठी उपस्थित होतो. संसदेत अनेक वेळा गंभीर विषयांवर चर्चा होत असते. परंतू कायमच सर्व जण अगदी गंभीर मुद्रेत असत नाहीत. थोडंफार हास्य होत असते. त्यामुळे या विषयाला फार महत्व देऊ नये, असे देखील खा. खडसे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version