मराठा समाजाला आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय मागे

मुंबई – मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यातली बैठक झाल्यानंतर याबाबतची माहिती देण्यात आली.

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मात्र मराठा समाजाच्या बांधवांनी घाबरुन जाऊ नये त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. इतकंच नाही तर मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली गेली ती मागे घेण्यात यावी यासाठी फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली होती. तसेच आज मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने मान्य केला होता. मात्र आज हा निर्णय आज मागे घेण्यात आला आहे.

भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. १० टक्केच्या आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गामध्ये सामील होण्यास सकल मराठा समाजाचा विरोध आहे. यातील जाचक अटी आम्हाला मान्य नाही असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यातली बैठक संपल्यानंतर संभाजी राजे यांनी यानंतर मराठा समाजातील विविध पदाधिकारी समन्वयक यांची भेट घेतली. यानंतर खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतल्याची माहिती दिली.

Protected Content