Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वादात दगडावर ढकलून दिलेल्या वडीलांचा मृत्यू; मुलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

चाळीसगाव  प्रतिनिधी । कपडे व सामान घेवून जाण्याच्या कारणावरून वडील व मुलगा यांच्यात झालेल्या झटापटीत वडीलांना दगडावर ढकलून दिल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील ओढरे गावात झाली. याप्रकरणी मुलाला चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. 

अधिक माहिती अशी की, गोकुळ भावसिंग जाधव (वय-४५) रा. ओढरे ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. तर मुलगा अमोल गोकूळ जाधव (वय-१८) हा १० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात कपडे व सामान घेण्यासाठी आला होता. त्यावेळी वडील गोकुळ आणि मुलगा अमोल यांच्या कडाक्याचे भांडण झाले. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत अमोलने वडील गोकुळ यांना घराबाहेर दगडावन ढकलून दिले. यात गोकूळ जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा अंत झाला. गोकूळ जाधव यांची मुलगी निकीता गोकूळ जाधव यांच्या फिर्यादीवरून मुलगा अमोल जाधव याच्याविरूध्द चाळीसगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संपत आहेर करीत आहे. 

Exit mobile version