Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापी नदी पात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील तापी नगराच्या पात्रात अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ही घटना बुधवार ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहराच्या नजीकच तापी नदी आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात एक अनोळखी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी भुसावळ शहर पोलिसांना कळविले. त्यानुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे नेण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ शहर पोलिसांनी केले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.

Exit mobile version