Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन दिवशीय स्काऊट गाईड शिबारीचा समारोप

WhatsApp Image 2019 12 19 at 6.18.45 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने आडगाव (कासोदा) धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे ३ दिवसीय स्काऊट गाईड शिबीर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी सिद्धेश्वर आश्रम येथे आयोजित करण्यात आले होते. आज या शिबिराचा समारोप करण्यात आला.

तीन दिवशीय स्काऊट गाईड शिबिराचा समारोप आज महामंडलेश्वर ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली, पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, प्रा. सुनील निकम, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य जाधव , आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिबिरामध्ये शाळेच्या ११५ विद्यार्थी – विद्यार्थिनी व १० शिक्षकवर्ग सहभागी झाले होते. आश्रम परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू टाकून निसर्गाच्या सानिध्यात आयोजित या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना व्यायामाचे व शिस्तप्रियतेचे महत्व शिकविण्यात आले. एक आगळावेगळा प्रयोग म्हणून शिबिरात सहभागी विद्यार्थिनीनी विना भांड्यांचा स्वयंपाक केला होता. त्याचा आस्वाद देखील प्रमुख मान्यवरांनी घेतला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचे निरीक्षण यावेळी करण्यात आले.

Exit mobile version