कोट्यवधी भारतीयांपर्यत कोरोना लस 2021पर्यंत पोहचणार

 

मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाचे संकट वाढत असतांना यावर लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतांना आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचं लक्ष्य असल्याचं स्पष्ट केले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लशीबाबत माहिती देतांना सांगितले की, भारतात 400-500 दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉनन्स या तीन कंपन्यांकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. या लशीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

Protected Content