हनुमंताच्या जन्म स्थानावरून सुरू झालाय वाद

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या धार्मिक स्थळांवरून वाद सुरू असतांना आता हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला होता ? यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

दक्षिणेतील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांच्या हनुमानच्या जन्मस्थळावरुन वाद सुरू झाले आहेत. हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री टेकट्यांमध्ये झाल्याचा दावा कर्नाटककडून केला गेलाय. तर आंध्र प्रदेशनं तिरुमलाच्या सात टेकड्यांमध्ये अर्थात सप्तगिरीत असलेल्या अंजनाद्रीमध्ये हनुमानाचा जन्म झाला, असा दावा केला आहे.

दरम्यान,  नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे हनुमानाचा जन्म झाल्याची देखील अनेक भाविकांची भावना आहे. नाशिकमध्ये अंजनेरी पर्वत नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचे मानले जाते अंजनेरी इथं हनुमानाचं एक मंदिर आहे. अंजनीपुत्र अशी ख्याती असलेल्या हनुमानाचा जन्म याच नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर झाला, असा एक युक्तिवाद केला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर झालेला नाही, असं म्हणत महंत गोविंदानंद यांनी म्हटलंय. हनुमानाचा जन्म हा किष्किंधामध्येच झाल्याचा दावादेखील त्यांनी केलेला आहे. यावरुन महंत गोविंदानंद यांनी नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्या, असं आव्हानं गोविंदानंद यांनी दिलंय.

हनुमानाच्या जन्मस्थळावर कोणाशीही आणि कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी केला आहे. हनुमानाचा  जन्म हा किष्किंधामध्येच झाल्याच दावा महंत गोविंदानंद यांनी केलाय. त्यावरुन चर्चेचं आव्हान देत महंत गोविंदानंद हे त्रंबकेश्वरमध्ये दाखल झालेत. या भेटीत नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असल्याचे वृत्त टिव्ही नाईन या वाहिनीने दिले आहे.

Protected Content