विद्यापीठातील सौर उर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा उद्या शुभारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ६५० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या वीज बिलात मोठी कपात होणार असून यातून पर्यावरणाचे संवर्धन देखील होणार आहे. हा प्रकल्प कॅपेक्स मोडवरील असून तो पारेषणाशी संलग्न असणारा आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ शनिवार दि.४ जून रोजी सकाळी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्‍वरी, प्रभारी कुलसचिव डॉ. किशोर पवार आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

Protected Content